बँकिंग क्षेत्रात संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रेसर असतांना, राज्यातील अग्रेसर पतसंस्था हा नावलौकिक जनसहकार या आर्थिक संस्थेने प्राप्त केला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज, विवीध सुविधांसह संस्थेच्या आधुनिक शाखांद्वारे, ग्राहकांना, हितचिंतकांना वेळोवेळी बँकिंग व्यवहाराच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करीत, होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहण्याचा प्रयन्त करीत आहोत.
जनमानसातील संस्थेबद्दल असलेल्या अतूट विश्वासामुळे व मा. चेअरमन व संचालक मंडळाच्या जनसंपर्कामुळे संस्थेच्या ठेवींमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. स्थापने पासूनच संस्थेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांपर्यंत जावून त्यांना सेवा दिलेली आहे. तसेच कष्टकरी, छोटे उद्योग, छोटे व्यवसाय यांना कर्ज देवून त्यांच्या व्यवसायाला नविन चालना दिलेली आहे. सभासद व ग्राहकांच्या गरजे प्रमाणे बचतीच्या व कर्जाच्या योजना तयार करून त्या सभासद व ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात संस्था नेहमीच अग्रणी राहिलेली आहे.
आपल्या सेवेत जनसहकार तत्पर आणि विनम्र सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहे. बँकिंगच्या अथांग सागरात आर्थिक ठेवीचा थेंब साठविण्यासाठी, आम्ही आपल्या सारख्या सुजान व जागृत ग्राहकांना समर्थ साथ देण्याचे आवाहन करीत आहोत.
धन्यवाद !
आम्हाला अभिमान आहे जनसहकार परिवारातील प्रत्येक सदस्याचा आणि प्रत्येक सदस्याला आपुलकीची सेवा देऊन जपणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा. संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास आम्हा सर्वांकरिता संघर्षाचा आहे, असंख्य अडचणींवर सकारात्मक मार्ग काढत आमची वाटचाल सुरु आहे. पाठीशी असलेल्या परिवारातील सदस्य आम्हाला बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याची प्रेरणा देतात.“आपुलकीची अर्थसेवा”हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवुण आम्ही नेहमीच ग्राहकांचा विश्वास सार्थ ठेवला आहे व हाच विश्वास आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतो. संस्थेच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर हा प्रवास आमच्यासाठी कसोटीचाच होता व नेहमीच राहणार.
जनसहकार परिवारातील हजारो सदस्यांचा विश्वास, त्यांच्या ठेवींची जबाबदारी, ठेवींवर चांगला परतावा व सुरक्षितता, उत्तम सेवा इ. मध्ये आम्ही व आमचे कर्मचारी कुठेही कमी पडू नयेत याची काळजी घेत “आपल्याकडे ठेवी किती यापेक्षा आपल्यावर ग्राहकांचा विश्वास किती” हे महत्वाचे मानत प्रगतीच्या वाटेवरील आमचा प्रवास सुरु आहे. व्यवसायापलीकडेही समाजाचे आपण काही देणे लागतो, ज्या समाजाने आपल्याला उभे केले, प्रेम दिले त्यांच्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो. नि:स्वार्थी सामाजिक कार्य या भावनेने सुरु झालेल्या या कार्याला आमच्या विचारांपेक्षा अधिक प्रोत्साहन मिळाले, अनेकांनी विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन आणि अनेकांनी या उपक्रमांकरिता आर्थिक देणगी देऊन आमचे मनोबल वाढवले. अनेक गरजूंच्या चेहऱ्यावरचे आनंदरुपी प्रेम आम्हाला पुढील कार्यासाठी प्रेरणा देत असते, अर्थातच तुम्हा सर्वांची साथ महत्त्वाचीच. येणाऱ्या काळात आम्ही ग्राहकसेवेस अनेक आधुनिक सेवा-सुविधा घेऊन येतोय, याकामी तुमची साथ असेलच यांत शकता नाही.
सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे. तुम्ही देत असलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार !
मा.श्री. अमोल प्रकाश मोरे
संचालकमा.श्री. संदीप रामचंद्र टोळे
संचालकमा.श्री. सुनिल शिवाजी आडावकर
संचालकमा.श्री. प्रशांत महादेव पोतदार
संचालकमा.श्री. मिलींद महादेव ताईगडे
मा.श्री. आनंदा तानाजी माने
संचालकमा.श्री. सचिन श्रीपती ताईगडे
संचालकमा.श्री. महेश हरीभाऊ कोकाटे
संचालकमा.श्री. काशिनाथ आण्णासो जाधव
संचालकमा.श्री. संजय मनोहर माटेकर
मा.श्री. महंमदहनीफ ताहेर सुतार
संचालकमा.सौ. सुरेखा सर्जेराव नलवडे
संचालिकामा. सौ. निर्मला उत्तम मोळावडे
व्यवस्थापिकामा. सुरेखा रघुनाथ मुळगावकर
व्यवस्थापकमा. प्रदीप रामचंद्र मोळावडे
मा . सौ .सुरेखा रघुनाथ मुळगावकर
गलमेवाडीमा . श्री .राजाराम नानासाहेब चोरगे
तळमावलेमा . श्री .सुनील शिवाजी आडवकर
दिंडेवाडीमा . श्री .जयवंत नारायण दिंडे
वायचळवाडीमा . श्री . तुकाराम लक्ष्मण धुमाळ
कुठरेमा . श्री .सतीश शशिकांत सागांवकर
मा . श्री .विलास हरी गोडांबे
गुढेमा . श्री .संजय खाशाबा पाटील
तळमावलेमा . श्री .उमेश ज्ञानदेव काळे
खळेमा . श्री .कुमार आनंद ठीक
वाझोलीमा . श्री .विकास रावजी मोरे
तळमावलेमा . श्री .सुनील दगडू पांढरपट्टे
मा . श्री .रमेश मानमन ओसवाल
चोरगेवाडीमा . श्री .उत्तमराव राजाराम जाधव
चिखलेवाडीमा . श्री .प्रकाश वसंत बोत्रे
मोरेवाडीमा . श्री .सुरेश अण्णा सपकाळ
मान्याचीवाडीमा. श्री. जयेंद्र शिवाजी मानेपकाळ