एस. टी बस सुविधा:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 1 वर्षात ४००० किलो मीटर प्रवास सवलतीच्या दरात करता येणार आहे. हाफ तिकीटा करता हे कार्ड आवश्यक आहे त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे.